अमरावती विद्यापीठ उपयोजित परमाणू विभागातील प्रा डॉ दारासिंह सोळंके यांच्या संशोधनाला आठ पेटेंट


अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उपयोजित परमाणू विभागातील प्रा डॉ दारासिंह सोळंके यांच्या विविध विषयांवरील संशोधनाला भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाने आठ पेटेंट मंजूर केले आहे.

प्रा डॉ दारासिंह सोळंके

‘इंटेलिजन्ट यूव्ही सेन्सर डिव्हाईस’, ‘डिझाईन अॅन्ड डेव्हलपमेंट ऑफ लो – कॉस्ट एम्बडेड सिस्टिम फॉर ऑटोमॅटिक स्पीड कन्ट्रोल ऑफ डीसी मोटर युसिंग डिप लर्निंग अॅप्रोच’, ‘रोड सरफेस इरेगुलेरिटिज’, ‘ऑब्जेक्ट डिटेक्शन अॅन्ड इमेज क्लासिफिकेशन युझिंग डिप लर्निंग अॅल्गोरिथमस्’, ‘अॅप्लिकेशन ऑफ सपोर्ट वेक्टर मशिन मॉडेल्स फॉर फोरकॉÏस्टग सोलर अॅन्ड वाईन्ड एनर्जी रिसोर्स’, ‘एआय बेस्ड फेस रिडिंग डिव्हाईस, एआय बेस्ड ऑटोमॅटिक रोबोटिक वेस्ट बिन’, ‘आयओटी बेस्ड ऑटोमॅटिक ब्रोकिंग सिस्टिम’, ‘ऑटोमॅटिक ब्रोकिंग मेकॅनिझम फॉर व्हेइकल्स बेस्ट ऑन आयओटी सेन्सर नेटवक्र्स’ अशा आठ संशोधनासाठी प्रा दारासिंह सोळंके यांना पेटेंट मंजूर करण्यात आले आहेत.

तर ‘डेव्हलपमेंट अॅन्ड अॅनॉलिसिस ऑफ लो कॉस्ट एम्बेडेड सिस्टिम फॉर व्हेईकल स्पीड डिटेक्शन अॅन्ड रोड सरफेस इरेग्युलॅरिटीज फॉर ऑटोमॅटिक ब्रोकिंग सिस्टिम’ आणि ‘ऑन दी पेरेनिअल इमेज क्लासिफिकेशन युसिंग अॅडव्हॉन्स डीप लर्निंग अॅप्रोच’ या संशोधनासाठी कॉपिराईट मिळाले असून त्यांचे एम एस्सी अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमासाठी चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि कॉपीराईटच्या या विविध पेटेंट्सचा उपयोग अत्यंत धोकादायक वातावरणामध्ये वापरात येणा-या स्वयंचलित वाहनांमध्ये आणि शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये होणार आहे.

या कार्यामध्ये त्यांना त्यांचे संशोधक मार्गदर्शक प्राचार्य डॉ योगेंद्र मांडोळे, प्राचार्य आदर्श विज्ञान महाविद्यालय, धामणगांव त्यांच्या विभागप्रमुख डॉ सुजाता काळे, सहकारी शिक्षक मित्रांचा सहयोग लाभला आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी प्रा दारासिंह सोळंके यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com