शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘भगवत गिता’ या विषयावर उद्बोधनपर विद्यार्थ्यांसोबत संवाद
यशस्वी होण्यासाठी व जिवनाचा आनंद घेण्यासाठी माणसांनी सत्कर्मी असावे – पुज्य स्वामी आत्मानंद सरस्वती
छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी येथील CSMSS छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अध्यात्मिक गुरु व वेदांत आश्रम, इंदोर येथील पुज्य स्वामी आत्मानंद सरस्वती यांनी ‘भगवत गिता’ या विषयावर उद्बोधनपर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, त्यामध्ये त्यांनी भगवतगितेचे विवेचन करताना आजच्या युगामध्ये लागू पडणाऱ्या व मनुष्य जातीला दिशा देणाऱ्या महत्वपूर्ण बाबींचा उल्लेख केला. ज्यामध्ये मानवी मूल्यांची जोपासना, आत्मचिंतन, आत्म प्रबोधन, ज्ञान संकलन, दृढनिश्चय इत्यादी बाबीवर विवेचन केले. आजच्या धक्काधकीच्या व स्पर्धेच्या युगात अध्यात्म व द्ढनिश्चय याशिवाय मानवाला जीवनाचा खरा आनंद घेता येणार नाही.
यानंतर त्यांनी भगवत गिता व सर्वसमावेशक नेतृत्व कौशल्य याविषयी सांगताना त्यांनी भगवत गीतेतील नेतृत्व कौशल्य पूरक अशा मार्गदर्शक श्लोकांचा संदर्भ दिला. शेवटी त्यांनी सत्य हे वैश्विक असून तुमचे कर्म हेच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवते. यशस्वी होण्यासाठी व जिवनाचा आनंद घेण्यासाठी माणसांनी सत्कर्मी असावे, तसेच मला काय मिळाले, त्यापेक्षा मी या जगाला काय देवू शकतो. याचा विचार प्रामुख्याने करणे अपेक्षित आहे. पुज्य स्वामी आत्मानंद सरस्वती यांचा सत्कार CSMSS छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे विश्वस्त समीर मुळे यांनी केला तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी आय आय मराठवाडा अध्यक्ष उद्योजक सुनील किर्दक यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी एन एस बी टी चे संचालक हर्ष जाजु, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उल्हास शिंदे, कृषी महाविद्यालय संचालक डॉ दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ लता काळे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य डॉ देवेंद्र भुयार, विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ मनोज मते यांनी तर आभार प्रदर्शन प्रा संजय कुलकर्णी यांनी केले.
वेदांतनगर पोलीस स्टेशनला रोपासह कुंड्या भेट.
छत्रपती संभाजीनगर येथील वेदांतनगर पोलीस स्टेशनला छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या (CSMSS) वतीने झाडासह कुंड्या भेट देण्यात आल्यात.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस बांधव उपस्थित होते.