नुतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची व्हेंच्युअर सेंटर, पुणे येथे शैक्षणिक भेट
कवठे महांकाळ : नूतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी शासकीय संचालित व्हेंच्युअर सेंटर पुणे येथे एक प्रेरणादायी शैक्षणिक भेट दिली. या भेटीमध्ये डॉ कविता पारेख आणि डॉ मुग्धा लेले यांनी व्हेंच्युअर सेंटर चा परिचय देत विद्यार्थ्यांना औषध विकास आणि संशोधनाच्या विविध प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. भेटीच्या शेवटी, तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांबरोबर प्रश्नोत्तरे आणि खुली चर्चा आयोजित केली, ज्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे समाधान केले.
विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या संशोधकीय भेटींची आवश्यकता आहे, यामुळे त्यांचा खरा विकास होतो आणि औषध उद्योगातील आव्हानांना ते सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी सांगितले. तसेच या भेटीने विद्यार्थ्यांना औषध उद्योगातील ताज्या ट्रेंड्सवर विचार करण्याची आणि संशोधनात कसे सहभागी होऊ शकतात याबद्दल समजून घेण्याची संधी मिळाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश जगताप यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा मनोहर केंगार व प्रा प्रशांत ऐवळे यांनी केले व प्रा ऋतुजा माळी, प्रा मोनिका बंडगर यांचे सहकार्य लाभले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ नुतन माळी व सचिव डॉ रामलिंग माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.