शैक्षणिक संस्थांनी देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका पार पाडावी – पद्मभूषण डॉ. विजय भटकर
विद्यापीठात आयडिया हंटिंग अॅन्ड पिचिंग इव्हेंटचे उद्घाटन
अमरावती : शैक्षणिक संस्थांनी उद्योग क्षेत्रांशी समन्वयक साधून संशोधनाला चालना देणे व त्या माध्यमातून देश पातळीवर नवोपक्रम व नवसंशोधनांना प्रोत्साहन देवून देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजाविणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभाग, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आयडिया हंटिंग अॅन्ड पिचिंग इव्हेंट कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु, डॉ. प्रसाद वाडेगावंकर, विशेष अथिती म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री किरण पातुरकर, विद्यापीठ अधिसभा सदस्य तथा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अमरावतीचे सचिव श्री आशिष सावजी, श्री गुरु गोविंदसिंह अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे प्रा. रामचंद्र मांथलकर, विभागीय केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाचे डॉ. ब्रिाजेश अय्यर, श्री. अतुल सराफ, कुलसचिव, डॉ. तुषार देशमुख, विभागाच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ पूर्वीपासूनच समन्वयाने औद्योगिक क्षेत्रात कार्यतर असून या कार्यक्रमामुळे नवीन उद्योजक निर्माण करण्यास अधीकच मदत होईल. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील संशोधनाचा वापर करुन अधिकाधिक उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन विशेष अतिथी श्री. किरण पातुरकर यांनी दिले. अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर म्हणाले, शिक्षण व औद्योगिक क्षेत्राच्या समन्वयातून अमरावती विभाग व देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने उद्योजकता व स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणे अत्यावश्यक असून त्याकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ नियमित अग्रेसर आहे. विविध औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूकदार व विद्याथ्र्यांना एका व्यासपीठावर आणून त्यांना त्यांच्या नवकल्पनांचे रुपांतर उद्योगात करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका विभागाच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांनी मांडली. कार्यक्रमाला वित्त व विधी सल्लागार तथा अधिसभा सदस्य श्री. उज्वल बजाज, अस्पा बंड सन्स प्रा.लि चे संचालक श्री. रंजीत बंड, पालेकर बेकरीचे संचालक श्री. सुरेश ठाकूर, सनदी लेखापाल संघटना, अमरावतीचे अध्यक्ष श्री विष्णूकांत सोनी, ओरेग डिजिटल प्रा.लि. चे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमित शाह, श्री. क्रिष्णा एझुथाचान, व्हेंचर कॅपीटल व हॉटेल चेन चे संचालक श्री. अखिलेश राठी, श्री. जयेश पनपालीया, लातूर येथील श्री. अतुल सराफ उपस्थित होते. यावेळी विद्याथ्र्यांनी आपले औद्योगिक नवकल्पनांचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन श्री. अमोल हिरुळकर यांनी, तर आभार श्री. आनंद यादव यांनी मानले. कार्यक्रमाला विविध विभागातील विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी, कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.