एमजीएम विद्यापीठात फुलांची उधळण करीत पर्यावरणपूरक होळी साजरी

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मानव व संसाधन विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या चिंतनगाह येथे शनिवार ( दि.२३ ) रोजी पर्यावरणपूरक होळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधितांनी फुलांची उधळण करीत पर्यावरणपूरक होळी साजरी केली.

यावेळी, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, सचिव तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ भाऊसाहेब राजळे, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, उद्योजक रणजित कक्कड, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

Advertisement

यावेळी विद्यापीठाच्या संगीत विभागाचे राहुल खरे व विद्यार्थ्यांनी होळीविषयीचे गाणे सादर केली. त्याचप्रमाणे होळीनिमित्त येथे चित्रकलेसह रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रा पल्लवी गायकवाड, प्रा आरती साळुंके व प्रा अतुल कुंजर यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. 

यावेळी, होळीनिमित्त एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली येथे तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक रंगाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधितांना वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मानव व संसाधन विभागाच्या संचालिका टीना सहारन, सहायक कुलसचिव प्रदीप गिऱ्हे, सोनिया नथानी, सतीश वलवे, अरुणा गाडेकर, रघुनाथ राठोड व संबंधितांनी आपले योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख राजू सोनवणे यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page