डी वाय पाटील फार्मसी, नर्सिंगला विजेतेपद – अंतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत झळकले
कोल्हापूर : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आणि मुलींच्या गटात डी वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे आयोजन शिवाजी विद्यापीठाच्या खो-खो मैदानावर करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात डॉ मुदगल यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडांमध्ये भाग घेण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, हार-जीत मान्य करत, खेळाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. शारीरिक तंदुरुस्तीला चालना देणारे खेळ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात कुलसचिव डॉ व्ही व्ही भोसले, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सचे प्राचार्य डॉ आर एस पाटील, संचालक विद्यार्थी कल्याण डॉ अद्वैत राठोड, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ सुरज यादव, सुशांत कायपुरे, आणि डॉ रोहित लांडगे उपस्थित होते.
मुलींच्या गटात कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्यात अंतिम सामना झाला. अत्यंत चुरशीने खेळलेला हा सामना 6-6 गुणांवर टाकल्यामुळे, जादा वेळामध्ये कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने 7-5 च्या फरकाने विजय मिळवला आणि स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
अखेर, कुलपती डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आ ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.