डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत
अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा – डॉ संजय डी पाटील
कसबा बावडा : 40 वर्षांपासून डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय उत्तम अभियंते घडवून देश सेवेमध्ये योगदान देत आहे. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेण्यासाठी आम्ही कटीबध्द पद्धत आहोत. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मिळवलेल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर समाजासाठी करावा असे आवाहन डी वाय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांनी केले. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ पालक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ संजय डी पाटील म्हणाले, डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातून शिक्षण घेवून यशस्वी झालेले अनेक विद्यार्थी आज देश -परदेशात नोकरी व्यवसाय करत आहेत. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उत्तम अभियंते घडविण्यासाठी आमचे सहकारी, प्राध्यापक, कर्मचारी नेहमीच प्रयत्नशील आहेत.
गेल्या दोन वर्षापासून डॉ डी वाय पाटील ग्रुपने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सौ शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. यावर्षी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या सात विद्यार्थ्यांना ही योजना लागू करत आहे. या सर्वांना यावर्षीची फी माफ करत असल्याची घोषणा डॉ संजय डी पाटील यांनी यावेळी केली.
प्रारंभी डॉ डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आल.
प्राचार्य डॉ संतोष चेडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश व महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम उपक्रमांची माहिती दिली.
कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांनी डी वाय ग्रुपच्या 40 वर्षाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढवा मांडला. ते म्हणाले, 40 वर्षापूर्वी पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांनी कसबा बावडा येथे शैक्षणिक संस्थेचे रोपटे लावले. डॉ संजय डी पाटील, आमदार सतेज डी पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील आणि पाटील कुटुंबीयांच्या अथक परिश्रमातून आज त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. डॉ डी वाय पाटील ग्रुपने अल्पावधीत शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती केलीय. डी वाय पाटील ग्रुपने केवळ चांगले डॉक्टर, इंजिनियर्सच नव्हे तर यशस्वी नागरिक घडवले आहेत. यावर्षी कर्नाटक, आंध्रप्रदेश, हरियाणासह 7 राज्यातील विद्यार्थ्यानी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.
यावेळी हरियाणा येथून आलेले पालक व माजी विद्यार्थी राजीव मित्तल, कुंभोजकर यांच्यासह विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करत डॉ डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले.
सुत्रसंचलन डॉ राधिका ढणाल, प्रा सुनंदा शिंदे यांनी केले तर आभार प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ नवनीत सांगळे यांनी मानले.
यावेळी रजिस्ट्रार डॉ एल व्ही मालदे, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा रविंद्र बेन्नी, सी एच आर ओ श्रीलेखा साटम यांच्यासह विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.