संशोधन संचालक डॉ विठ्ठल शिर्के यांच्या हस्ते हाळगावच्या कृषि महाविद्यालयात वृक्षारोपण

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे संशोधन संचालक डॉ विठ्ठल शिर्के यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्याल, हाळगाव येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कृषि महाविद्यालयातील प्रयोगशाळा, प्रक्षेत्र, ग्रंथालय व जिमखाना या विकास कामांचा सहयोगी अधिष्ठाता व महाविद्यालयातील शिक्षक यांच्याकडून आढावा घेतला.

Advertisement

यावेळी डॉ विठ्ठल शिर्के यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. सहयोगी अधिष्ठाता डॉ अनिल काळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. या भेटी दरम्यान डॉ शिर्के यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ दत्तात्रय सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सखेचंद अनारसे, डॉ प्रेरणा भोसले, डॉ नजीर तांबोळी, प्रा पोपट पवार, प्रा अरुण पाळंदे व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page