“डॉ बाआंमवि”चे माजी क्रीडा संचालक डॉ उदय डोंगरे यांना ‘स्पोर्ट्स इंडिया’चा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक डॉ उदय डोंगरे यांना ‘स्पोर्ट्स इंडिया’चा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे स्पोर्ट्स इंडिया फाउंडेशन व फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती मैदान आयोजित स्पोर्ट्स इंडिया कॉन्फरन्समध्ये ‘उत्कृष्ट क्रीडा उपक्रम आयोजक’ राष्ट्रीय पुरस्काराने शुक्रवारी त्यांना गौरविण्यात आले.

शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ उदय डोंगरे कार्यरत आहेत. डॉ उदय डोंगरे यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, आंतर विद्यापीठ व अंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन आखून यशस्वी आयोजन केल्याबद्दल हा पुरस्कार विश्वास कैलास सारंग (क्रीडामंत्री, मध्य प्रदेश), एल हमर (क्रीडामंत्री, मिझोरम) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी रमेशचंद्र मिश्रा (आमदार, उत्तर प्रदेश), अमित सिन्हा (प्रिन्सिपल सेक्रेटरी, उत्तराखंड राज्य) ए के बन्सल (द्रोणाचार्य पुरस्कार विजेते तथा अध्यक्ष, फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया) व पियूश जैन (सचिव, फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया) आदिंची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ उदय डोंगरे यांचे कुलगुरू डॉ विजय फुलारी, छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानसिंह पवार, सचिव अशोक आहेर, सदस्य बाबासाहेब मोहिते, प्राचार्य डॉ विजय भोसले, उपप्राचार्य डॉ भाऊसाहेब मगर, नॅक समन्वयक डॉ विजय मातकर यांनी अभिनंदन केले आहे.
सोबत फोटो
कॅपशन :- उत्कृष्ट क्रीडा उपक्रम आयोजक राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. उदय डोंगरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विश्वास कैलास सारंग (क्रीडामंत्री, मध्य प्रदेश), एल. हमर (क्रीडामंत्री , मिझोरम ), पियूष जैन आदी .