देवगिरी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या संचालक पदी डॉ सुभाष लहाने यांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ उल्हास शिउरकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ सुभाष लहाने यांची १ एप्रिल २०२५ रोजी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ लहाने यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून मैकेनिकल इंजीनियरिंग ची पदवी आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रांची येथून पदव्युत्तर (एमटेक) शिक्षण घेतले आहे. तसेच, डॉ लहाने यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT दिल्ली) येथून पीएच डी पूर्ण केली आहे. त्यांना शैक्षणिक आणि प्रशासनाच्या क्षेत्रात १८ वर्षांचा अनुभव असून, उद्योग क्षेत्रातील ४ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी ते सीओईपी पुणे (COEP Pune) आणि बीआयटी मेसरा, रांची येथे कार्यरत होते.
त्यांचे तज्ज्ञ क्षेत्र आईसी इंजिन, हीट ट्रांसफर, फ्लूइड मकैनिक्स, सीएफडी, वाहतुकीसाठी पर्यायी इंधने (बायोफ्युएल्स, हायड्रोजन, CNG, LPG, बायोगॅस इ), कम्बस्चन (Combustion) इत्यादी आहेत.
डॉ लहाने हे डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांचे मान्यताप्राप्त पीएच डी मार्गदर्शक आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले आहे.
डॉ लहाने यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रे नामांकित आंतरराष्ट्रीय एससीआय आणि स्कोपस जर्नल्स आणि परिषदांमध्ये प्रकाशित केली आहेत. ते ASME, Solar Energy, ISTE, IE, FMFP, Combustion Institute, IACSIT आणि SAE यांसारख्या व्यावसायिक संस्थांचे सदस्य आहेत. तसेच, ते विविध प्रतिष्ठित जर्नल्सच्या संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत.
ते इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इंडिया यांच्या सल्लागार (मार्गदर्शक) मंडळाचे सदस्य देखील आहेत. तसेच, ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुनरावलोकन (peer-reviewed) जर्नल्ससाठी पुनरावलोकक (Reviewer) म्हणून कार्य करतात.
त्यांना २०१२ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR) यांच्याकडून “यंग सायंटिस्ट अवॉर्ड” (Young Scientist Award) प्रदान करण्यात आला होता.
डॉ लहाने यांचा प्रदीर्घ शैक्षणिक आणि औद्योगिक अनुभव विद्यार्थ्यांसाठी मोलाचा ठरेल आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान देईल, असे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण यांनी नवनियुक्त संचालक डॉ सुभाष लहाने यांना नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या, तसेच महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख डॉ सत्यवान धोंडगे, डॉ गजेंद्र गंधे, डॉ सचिन बोरसे, डॉ सुगंधा असोदेकर, डॉ आरती वाढेकर, डॉ शोएब शेख, डॉ रूपेश रेब्बा, डॉ राजेश औटी, अच्युत भोसले, अमर माळी, प्राध्यापक वर्ग व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.