अमरावती विद्यापीठाचे डॉ श्रीकांत पाटील यांचे ‘मल्टिफंक्शनल मल्टिपर्पज टूल’चे पेटंट कृषीसाठी क्रांतिकारक
अमरावती : यवतमाळ जिल्ह्रातील सावना येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ पंकज एस चौधरी आणि विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांना भारत सरकारने ‘मल्टिफंक्शनल मल्टिपर्पज टूल’ या विकसित आविष्काराचे पेटंट दिले आहे. डॉ पंकज चौधरी यांनी डॉ श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शनात आचार्य पदवी संपादन केली आहे हे विशेष. अतिशय सूटसुटीत वापरायला सोपे असे हे बहुउपयोगी यंत्र असून शेतकऱ्यांना वरदान ठरणारे व सोफ्या पध्दतीने हाताळनारे विविधलक्षी ,फायदेशीर यंत्र कमी वेळात काम करू शकते.
सदर ‘मल्टिपर्पज टूल’ हे एक असे साधन आहे ज्यात गवत कापणी, फ्लोअर क्लीनिंग, स्टिलिंग आणि ड्रिलिंग सारख्या अनेक कार्यक्षमता एकाचवेळी उपलब्ध आहेत. शिवाय विद्युतप्रवाह खंडीत होण्याची समस्या असेल किंवा जेथे लोडशेडिंग असेल अश्या वेळी चार्जेबल बॅटरीवर काम करणारे हे अनोखे यंत्र बनवले आहे. विशेष म्हणजे हे साधन बनवण्यासाठी लागणारी उपकरणे बाजारात सहज उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रासाठी हा क्रांतिकारी आविष्कार आहे. हे उपकरण केवळ वीजच नव्हे तर रिचार्जेबल बॅटरीद्वारे चालते जे कामाच्या ठिकाणी विजेच्या समस्येवर मात करते. नको असलेले गवत कापण्यासाठी, पिकापासून, खोदकामापासून पाईपलाईन तयार करण्यासाठी शेतकरी याचा वापर करू शकतो.
तणनाशकासाठी फवारणी व कमी मनुष्यबळात हे यंत्र काम करू शकते. ज्या प्रदेशात वीज उपलब्ध नाही, त्या प्रदेशासाठी ही उदात्त देणगी ठरू शकते. रासायनिक उद्योगात घातक द्रव रसायन मिसळण्यासाठी या मल्टिफंक्शनल टूलचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर बागेच्या देखभालीसाठी गवत कापणे, फरशी साफ करणे अशी घरगुती कामे या साधनाने सहज पणे होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरणारे असे हे यंत्र असून यामुळे मानवी जीवन अधिक चांगले होईल विश्वास डॉ श्रीकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ श्रीकांत पाटील यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारा कृषीक्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांन सक्षम करण्या दृष्टीने कौशल्य विकासा वर आधारित चार अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले असून हे अभ्यासक्रम शाळा महाविद्यालय चॅरिटेबल ट्रस्ट एन जी ओ चालऊ शकतात. अधिक माहितीसाठी डॉ श्रीकांत पाटील यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.