सौ के एस के महाविद्यालयात डॉ शुभदा राठी लोहिया यांचे व्याख्यान संपन्न
आपला भोवताल आपली जबाबदारी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
बीड : नवगण शिक्षण संस्थेच्या सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पर्यावरण समितीच्या वतीने पर्यावरण प्रदुषण आरोग्य विकासाच्या संदर्भात जाणीव जागृती व्हावी. यासाठी डॉ शुभदा राठी लोहिया वैद्यकीय समुपदेशक व पक्षी निरिक्षक अंबाजोगाई यांचे व्याख्यान झाले. नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान आयोजित केले होते.
डॉ शुभदा राठी लोहिया यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाल्या की, वाढते तापमान हा अत्यंत गंभीर असा प्रश्न जगाच्या समोर निर्माण झालेला आहे. जग हे विविध समस्याने ग्रासले आहे. वाढत्या तापमानामुळे भाविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. तसेच प्लॉस्टीक कचर्याची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भातील देखील सखोल असे मार्गदर्शन केले. पक्षी संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविणे त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचा आणि समाजाचा सुध्दा यात सहभाग असावा असे सांगण्यात आले. तसेच भविष्यात जैविक विविधतेचा धोका कसा निर्माण झाला आहे या बद्दल सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, प्रदुषण ही एक समस्या दिवसंदिवस जगाला भेडसावत आहे. त्यामुळे निसर्गातील अन्न साखळी अबाधीत राहण्यासाठी सर्वानी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सर्वानी गाडीचा आवाज कमी असणे, टी व्ही, मोबाईलचा कमी वापर करणे जास्तीत जास्त कचर्या कुंड्याचा वापर आणि योग्य त्याच ठिकाणी कचरा टाकणे, सर्वानी हवेच्या नियमाचे पालन करणे त्यासाठी सर्वानी जास्ती जास्त झाडे लावणे व नियमाचे पालन करणे आवश्यक आदीवर त्यांनी प्रदूषणावर सविस्तर माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, संस्थेचे पदाधिकारी डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर सह महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र समिती प्रमुख डॉ प्रेमचंद सिरसट व आभार डॉ संध्या जोगदंड यांनी मानले तस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दीपाजी चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.