उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्यपदी प्राचार्य डॉ शंकरसिंग राजपूत व अधिष्ठाता प्रा जगदिश पाटील यांची निवड
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्यपदी कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ शंकरसिंग राजपूत व मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रा जगदिश पाटील यांची नियुक्ती केली आहे.


महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील कलम ३० (४) (डी) नुसार दोन अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेवर सदस्यपदी नियुक्त करण्याची तरतूद आहे. या तरतूदीच्या अनुषंगाने कुलगुरु प्रा माहेश्वरी यांनी प्राचार्य डॉ शंकरसिंग राजपूत व प्रा जगदिश पाटील यांची व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती केली आहे. तसे पत्र विद्यापीठाकडून निर्गमित करण्यात आले आहे.
प्रा राजपूत हे एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर व प्रा जगदिश पाटील हे विद्या वर्धिनी महाविद्यालय, धुळे येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ विनोद पाटील यांनी दिली.