फॉरेन्सिक मेडिसिन अॅण्ड टॉक्झीकॉलॉजी विषयाकरीता गठीत पुनरावलोकन समितीच्या अध्यक्षपदी डॉ संदिप कडू यांची निवड
फॉरेन्सिक मेडिसिन अॅण्ड टॉक्झीकोलॉजी क्षेत्रात कामाचा सुमारे २० वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव
नाशिक : कॉम्प्लीमेंटरी बेसड् मेडिकल एज्युकेशन अभ्यासक्रमाच्या फॉरेन्सिक मेडिसिन अॅण्ड टॉक्झीकॉलॉजी विषयाकरीता गठीत पुनरावलोकन समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ संदिप कडू यांची नॅशनल मेडिकल कमिशनतर्फे निवड झाली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प, प्रति-कुलगुरु डॉ मिलींद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी अभिनंदन केले.
दिल्ली येथील नॅशनल मेडिकल कमिशन कडून कॉम्प्लीमेंटरी बेसड् एज्युकेशनच्या अनुषंगाने पुनरावलोकन करण्यासाठी संबधित विषयातील तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येते. या अनुषंगाने फॉरेन्सिक मेडिसिन अॅण्ड टॉक्झीकोलॉजी विषयाकरीता गठीत करण्यात आली असून या समितीत डॉ संदिप कडू अध्यक्ष आहेत तसेच डॉ राजेशकुमार बारनवाल, डॉ रक्तीम प्रतिम तामुली, डॉ व्यंकटेशन एम, डॉ संजय दास आदी सदस्य आहेत.
या समितीने फॉरेन्सिक मेडिसिन अॅण्ड टॉक्झीकोलॉजी विषयाचे पुनरावलोकन करुन अभ्यासक्रमासाठी योग्य दुरुस्ती सुचवणे अपेक्षित आहे जेणेकरुन नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम अद्ययावत करणे सोपे होईल. या समितीचे अध्यक्ष डॉ संदिप कडू यांना फॉरेन्सिक मेडिसिन अॅण्ड टॉक्झीकोलॉजी क्षेत्रात कामाचा सुमारे २० वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव आहे. या समितीत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना विद्यापीठाचे विविध प्राधिकरण सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.