डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र विभाग प्रमुखपदी डॉ.रमेश मंझा

Dr. Ramesh Manjha as Head of Department of Computer Science in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख पदी डॉ.रमेश मंझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी आगामी तीन वर्षांसाठी डॉ.मंझा यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. डॉ.सचिन देशमुख यांच्याकडून सोमवारी (दि.२२) त्यांनी पदभार घेतला. डॉ.मंझा हे गेल्या २५ वर्षांपासून अध्यापन, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्या परिषद सदस्य सह विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. या नियुक्तीबद्दल प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page