नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू पदी डॉ राजेंद्र काकडे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून डॉ राजेंद्र काकडे यांनी गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पदभार स्वीकारला. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ राजेंद्र काकडे यांचे पदभार स्वीकारल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी कुलसचिव डॉ राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रभारी संचालक डॉ संजय कवीश्वर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत माहेश्वरी, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी, आंतर विद्याशाखीय अभ्यासविद्या शाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू, आयआयएल प्रभारी संचालक डॉ निशिकांत राऊत, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ विजय खंडाळ, डॉ संजय ढोबळे, डॉ कीर्तीकुमार रणदिवे, उपकुलसचिव संजय बाहेकर, डॉ राजेंद्र उतखेडे, उमेश उईके, सहाय्यक कुलसचिव गणेश कुमकुमवार, संजय भोयर, उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे, कुलगुरू कार्यालयातील सतीश साधनकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com