मराठवाडा विद्यापीठातील ग्रामीण समस्या संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ प्रशांत अमृतकर
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रामीण समस्या संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉ प्रशांत अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून ते कार्यरत असून कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही वर्षभरापासून त्यांच्याकडेच आहे. या पदावर कार्यरत असलेल्या डॉ राम चव्हाण यांची मुक्तानंद महाविद्यालयात प्राचार्यपदी नियुक्ती झाल्यामुहे सदर पद रिक्त झाले.
या पदावर कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी डॉ अमृतकर यांची नियुक्ती केली. डॉ अमृतकर हे गेल्या २५ वर्षापासून अध्यापन, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ‘पंचायत राज व ग्रामविकास’ हा त्यांच्या पीएच डी संशोधनाचा विषय असून विद्यापीठ अनुदान आयोगाचा याच विषयावरील प्रकल्प त्यांच्याकडे सध्या सुरू आहे.