परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील डॉ प्रल्हाद भोपे सेट परीक्षेत उत्तीर्ण

परभणी : श्री शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभगाचे प्रमुख प्रा डॉ प्रल्हाद भोपे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिलमध्ये घेतलेल्या शिक्षणशास्त्र विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण केली. ते यापूर्वी मराठी विषयात सेट, नेट, असून पीएच डी प्राप्त आहेत.

त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे व मराठी व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय वृंदांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com