गोंडवाना विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ प्रदीप आगलावे यांचे १७ एप्रिल रोजी व्याख्यान
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाश समितीचे सदस्य सचिव डॉ प्रदीप आगलावे यांचे गोंडवाना विद्यापीठामध्ये 17 एप्रिल रोजी सकाळी 11:00 वाजता आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ अनिल हिरेखण यांनी केले आहे.