डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे शिक्षक दिना निमित्त शिक्षकांच्या सेवाकार्याचा गौरव

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेबर २०२४ रोजी अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत ‘शिक्षक दिन’ म्हणूनसाजरा करण्यात आला.

Dr. Panjabrao Deshmukh Memorial Medical College honors the service of teachers on the occasion of Teacher's Day

राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन शिक्षक डॉ पवन टेकाडे, डॉ आशिष साबु, डॉ रामावतार सोनी, डॉ सुनय व्यास व डॉ सविता वावगे यांच्या शैक्षणिक व आरोग्य सेवाकार्याची नोंद घेऊन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांच्या हस्ते तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ वसंत लुंगे, डॉ सुभ्रजीत दासगुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com