डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण माहचे उद्घाटन संपन्न
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे ०३ सप्टेंबर पासून राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारद्वारे राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरूवात २०१८ साली करण्यात आली होती. त्याअनुषंगाने डॉ पंजाबराव देशमुख रूग्णालयामध्ये ६ व्या राष्ट्रीय पोषण माहचे उद्घाटन दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ रोजी अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. रूग्णालयाच्या आहारतज्ञ डॉ उज्वला ढेवले यांनी प्रदर्शित केलेल्या ‘तेल व तूप वापरतांना’ या विषयावर आधारित घोष वाक्याच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय पोषण माहच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यावेळी व्यासपीठावर रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ पवन टेकाडे, डॉ अजय जावरकर, डॉ वसंत लुंगे हे उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांनी उद्घाटन पर भाषणात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले, मुलांनी नैसर्गिक पोषक आहाराचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करावा व फास्ट फूड, जंक फूड याचा वापर टाळावा असे विद्यार्थ्यांना सांगितले.
आहारतज्ञ डॉ उज्वला ढेवले यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पोषण माहिती थिम, तेल व तूप वापरतांना’ या विषयावरील घोष वाक्य प्रदर्शनीबद्दल सांगितले. त्याचप्रमाणे healthy food pyramid & unhealthy food pyramid म्हणजे काय व healthy food pyramid प्रमाणे आपला दैनंदिन आहार कसा घ्यावा याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमात डॉ विनोद वासनिक, डॉ विठ्ठल खानंदे, ऋग्वेद देशमुख, किशोर इंगळे, मंजुषा देशमुख तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.