डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जयंतीदिनी स्वच्छता दिन साजरा
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे बुधवार, दिनांक २ ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.

यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ वसंत लुंगे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, बीव्हीजी एजन्सीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी स्वच्छता अभियानात भाग घेऊन परिसराची स्वच्छता केली.