विद्या परिषदेतून डॉ नितीन चांगोले व डॉ विद्या शर्मा यांची व्यवस्थापन परिषदेवर निवड
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विद्या परिषदेची सभा कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
व्यवस्थापन परिषदेवर डॉ नितीन वसंतराव चांगोले, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती यांची अविरोध, तर डॉ विद्या अनंत शर्मा, नरसिम्हा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांची, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर डॉ जी आर ढोकणे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चिखलदरा, जि अमरावती यांची, विद्यापीठ शिक्षक कल्याण निधी समितीवर डॉ पी एम जावंधिया, पंकज लड्डड, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज, येलगांव, जि बुलडाणा यांची अविरोध व डॉ एच एस चांडक, जी एस विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव, जि बुलडाणा यांची तर विद्यापीठ विद्यार्थी कल्याण निधी समितीवर डॉ अरुणा वाडेकर, महिला महाविद्यालय, अमरावती या सदस्यांची निवड झाली.
विद्या परिषद सभेत निवडणूक घेण्यात आली. व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका सदस्यांसाठी डॉ विद्या अनंत शर्मा व डॉ वर्षा श्रीधर सुखदेवे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या सदस्यांमध्ये डॉ विद्या अनंत शर्मा यांना 35 तर डॉ वर्षा श्रीधर सुखदेवे यांना 24 मते मिळालीत आणि डॉ शर्मा यांना विजयी घोषित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासाठी एका जागेकरीता डॉ काशीनाथ विनायक बऱ्हाते व डॉ जी आर ढोकणे हे उमेदवार सदस्य रिंगणात होते. यापैकी डॉ बऱ्हाटे यांना 19 तर डॉ ढोकणे यांना 41 मते मिळालीत व डॉ ढोकणे विजयी झालेत.
शिक्षक कल्याण निधी समितीवर निवडून द्यावयाच्या एका जागेकरीता डॉ एच एस चांडक व डॉ नामदेव ढाले हे उमेदवार सदस्य रिंगणात होते. यापैकी डॉ चांडक यांना 40 तर डॉ ढाले यांना 20 मते प्राप्त झालीत व डॉ चांडक विजयी झालेत. विद्यार्थी कल्याण निधी समितीवर एका जागेसाठी डॉ अरुणा वाडेकर अविरोध निवडून आल्यात.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी काम पाहिले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला 61 सदस्य उपस्थित होते. निवडणुकीसाठी प्राचार्य डॉ राजेश जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ सुभाष गवई व प्राचार्य डॉ जयंत कावरे या सदस्यांची छाननी समिती गठीत केली होती. निवडणुकीच्या व सभा आयोजनाच्या कामामध्ये विद्या विभागाचे उपकुलसचिव ऋतुराज दशमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग दिला. मत मोजणीच्या कामासाठी सहा कुलसचिव डॉ विरेंद्र निमजे, जय भडके व अनि़ल मेश्राम यांनी व सहकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सहपत्र डिजिटल स्वरुपात देण्याचा निर्णय
विद्या परिषदेच्या संपन्न झालेल्या सभेत विषय पत्रिकेसोबत द्यावयाच्या सहपत्राचे स्वरुप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सहपत्र डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सभागृहात मान्य करण्यात आला.