महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ नारायण मुसमाडे यांना आचार्य पदवीच्या संशोधनासाठी मिळाले पेटंट

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना या विभागातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ नारायण अण्णासाहेब मुसमाडे यांनी गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठ, वनस्पती रोगशास्त्र या विषयात आचार्य (डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली. मुसमाडे यांनी पिकांना जमीनीमधुन रोग पसरविणाऱ्या बुरशींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करुन केळीच्या खोडाचा रस आणि खेकड्याच्या अवरणात उपलब्ध असलेल्या चीटोसन याचा संयुक्त वापर करुन संकरीत सिलव्हर नॅनोपार्टीक्लस हे संशोधीत करुन त्या संशोधनाच्या आधारे शोध प्रबंध सादर केला.

Advertisement

या संशोधनामुळे पर्यावरन अनुकूल पध्दतीने रोग नियंत्रण करता येईल. बुरशीनाशक अंशविरहित उत्पादन घेण्यासाठी या संशोधनाचे मोठे योगदान असेल. या पी एचडी च्या संशोधनावर पेटंट मिळविण्यासाठी त्यांनी भारतीय पेटंट कार्यालय, भारत सरकार, चेन्नई येथे अर्ज केला होता. त्यांच्या संशोधनाची छाननी करुन भारत सरकारने त्यांना या संशोधनासाठी पेटंट बहाल केले आहे. मुसमाडे यांनी दोन आंतरराष्ट्रीय परीषदेमध्ये या संशोधनावर शोध प्रबंधाचे सादरीकरण केले यामध्ये त्यांना उत्कुष्ठ सादरीकरणाचे प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक मिळाले आहे. पीएच डी च्या संशोधन अभ्यासासाठी मुसमाडे यांना गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील वनस्पती रोगशास्त्रज्ञ (विषाणू शास्त्रज्ञ) डॉ ललीत महात्मा यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ अण्णासाहेब नवले, बियाणे विभाग प्रमुख डॉ आनंद सोळंके व बियाणे संशोधन अधिकारी डॉ विजय शेलाल आणि विद्यापीठाच्या इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page