डॉ जे जे मगदूम फार्मसी महाविद्यालयाची गोवा येथील बहुराष्ट्रीय औषध कंपन्यामध्ये औद्योगिक भेट
जयसिंगपूर : डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजची औद्योगिक भेट संपन्न फार्मसी शिक्षण क्षेत्रात मोलाचा ठसा उमटवणाऱ्या जयसिंगपूर येथील डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज या महाविद्यालयातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची तीन दिवसीय औद्योगिक भेट गोवा येथे नुकतीच पार पडली. ही भेट गोवा येथील बहुराष्ट्रीय कलरकॉन आणि ब्ल्युक्रॉस या सुप्रसिद्ध औषध कंपन्यामध्ये झाली.

या भेटी दरम्यान औषधनिर्मिती मधील संशोधन, गुणवत्ता पडताळणी, प्रक्रिया आणि उत्पादन आशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. कलरकॉन चे आर अँड डी विभागाचे प्रमुख शंतनू दामले, ब्ल्यु क्रॉस चे यूनिट हेड नीलेश अमोनकर आणि एचआर दिनेश सिंह यांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले. इंडस्ट्री मध्ये प्रत्येक विभागात योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. पदवी अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे. अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कार्यक्षेत्राशी संबंधित असल्याने खूप महत्वातची ठरते.
आशा औद्योगिक भेटीचे आयोजन करणे वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे जाऊन, औषधनिर्मिती उद्योगाचे कामकाज, बाजारातील सध्याचे ट्रेंड, उद्योगाची भविष्यातील परिस्थिती आणि उद्योगात लागू होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल ज्ञान देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी महत्वाची ठरते, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शितलकुमार एस पाटील यांनी केले. या भेटीसाठी डॉ जे जे मगदुम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजयराज मगदुम आणि वाइस चेअरपर्सन अॅड डॉ सोनाली मगदुम यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या औद्योगिक भेटीचे नियोजन महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे विभाग प्रमुख प्रा विनोद पाटील यांनी केले.