जिपॅट परीक्षेत डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
जिपॅट परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते
जयसिंगपूर : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या जिपॅट अर्थात ग्रॅज्युएट फार्मसी एप्टिट्यूट टेस्ट या परीक्षेत डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. औषध निर्माण शास्त्राच्या पदव्युत्तर पदवी अर्थात एम फार्मसी या उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.
अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जिपॅट परीक्षेत महाविद्यालयाचा विद्यार्थी दत्ता जाधव याने राष्ट्रीय स्तरावर २३ वा क्रमांक मिळवला असून त्याचबरोबर, ओंकार आलासे (क्र ११४८), यश चव्हाण (क्र ३५०६), सोनाली चिखलव्हाळे (क्र ३६०८), आणि अपूर्वा कुडाळे (क्र ९६१९) यांनीही यश मिळवले आहे. आता हे सर्व विद्यार्थी फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया कडून पदव्युत्तर पदवी साठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
महाविद्यालयामध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळणाऱ्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे यावर्षी ही परंपरा कायम राखत या पाच विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केले आहे. संपादित केलेले यश खरंच वाखणण्याजोगे आहे. यासाठी महाविद्यालयाने केले प्रयत्नही तितकेच मोलाचे आहेत जसे विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन देणे व ऑनलाईन सराव परीक्षा घेणे या सर्वांचे फलित म्हणून यशाची ही परंपरा कायम राखत महाविद्यालयाच्या दृष्टीने ही घोडदौड चालू आहे.
या परीक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शितलकुमार एस पाटील, जिपॅट समन्वयक प्रा विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून अत्यंत नियोजनपूर्वक तयारी करून घेतली होती तसेच, शैक्षणिक समन्वयक डॉ सतीश किलजे व इतर प्राध्यापकांनी संबंधित विषयाबाबत मार्गदर्शन केले होते. यासाठी डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम, व व्हाईस चेअर पर्सन अॅड डॉ सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ विजय मगदूम यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे हे यश संपादन झाले आहे व भविष्यात सुद्धा या यशामध्ये अशीच वाढ होऊन महाविद्यालाय उत्तरोत्तर प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला.