डॉ जे जे मगदुम फार्मसी महाविद्यालयाकडून मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादर
जयसिंगपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संसदीय लोकशाहीमध्ये नागरिकांना मतदानाच्या अधिकारबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार एस. पाटील व शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून निवडणूक साक्षरता क्लब व तहसील कार्यालय शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्याचा विषय ‘मतदार राजा जागा हो’ हा होता. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकशाही बळकट व मजबूत करण्यासाठी नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करणे, तसेच मतदानाची टक्केवारी वाढविणे याबाबत पथनाट्याद्वारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार एस. पाटील, डॉ. सतीश किलजे, डॉ. प्रियंका गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी हे उपस्थित होते.
या पथनाट्यासाठी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व व्हाईस चेअर पर्सन अडो. डॉ. सोनाली मगदूम यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रणिल तोरसकर, प्रा. सौरभ समडोळे, प्रा. शुभम पाटील, कॉलेज ईएलसी प्रतिनिधि कु. प्रतीक कुन्नूरे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.