उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ ज्ञानानंददास स्वामी यांचे शनिवारी व्याख्यानाचे आयोजन

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने शनिवार दि. २७ जानेवारी २०२४ रोजी यशोवल्लभ व्याख्यानमाले अंतर्गत डॉ. ज्ञानानंददास स्वामी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

KBCNMU-GATE

शनिवारी सकाळी १०:३० वाजता अधिसभा सभागृहात डॉ. ज्ञानानंददास स्वामी हे “विज्ञान आणि अध्यात्मः मानवी प्रगतीचे संश्लेषण” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. डॉ. ज्ञानानंद स्वामी हे बीएपीएस स्वामीनारायण रिसर्च इन्स्टिट्यूट, अक्षरधाम नवी दिल्ली येथे सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी राहणार असून व्याख्यानमालेचे प्रायोजक अॅङ गिरीधरलाल गुजराथी यांची उपस्थिती राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com