डॉ डी वाय पाटील कृषि पदविका संघाचा खो-खो स्पर्धेत घवघवीत यश

तळसंदे / कोल्हापूर : डॉ डी वाय पाटील कृषि पदविका महाविद्यालयाच्या मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून चमकदार कामगिरी केली. या विजयामुळे संघातील ११ खेळाडूंची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे आयोजन राजर्षी शाहू कृषी तंत्र विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे करण्यात आले होते. प्राचार्य पी एस पाटील, रजिस्ट्रार आर पी शिंदे, तसेच प्रशिक्षक एस एस कदम, एस ए कांबळे, एस व्ही शिंदे आणि व्ही एस कोंडविलकर यांनी संघाला उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आणि विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com