डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निक संघाला विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद
कसबा बावडा : डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निक संघाने इंटर डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत पहिला स्थान मिळविले. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विविध संघांनी भाग घेतला.

विजेतेपद मिळवणाऱ्या संघात अथर्व शिंदे, हेथ छाब्रिया, मितेश पटेल आणि यश पाटील यांचा समावेश आहे. या संघाने उपांत्य सामन्यात बीएसआयटी कोल्हापूरवर विजय मिळवला, तर अंतिम सामन्यात वायबीआयटी सावंतवाडी संघावर मात केली. या यशामुळे, हा संघ राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे.
विजेत्या संघाला प्राचार्य डॉ महादेव नरके, जिमखाना विभाग प्रमुख प्रा अक्षय करपे, प्रा सूरज जाधव यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांचे उत्साहवर्धक प्रोत्साहन मिळाले.