‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ डी एम नेटके, किरडे, तिडके आणि हंबर्डे सेवानिवृत्त

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर मोलाजी नेटके, शैक्षणिक नियोजन व विकास विभागातील व लिपिक मोहन विठ्ठलराव किरडे, परीक्षा विभागातील व लिपिक नारायण संभाजी तिडके आणि स्थावर विभागातील ठ वे क कर्मचारी दासराव माधवराव हंबर्डे हे चारही नियतवयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दि ३१ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी सेवानिवृत्त सत्कारमूर्तींचे शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ डी एम खंदारे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ विनायक जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

डॉ दिगंबर नेटके यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून विद्यापीठास ०२ वर्षे सेवा देवून ते दि ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले होते. आता ते विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Advertisement

व लिपिक मोहन किरडे हे नियतवयोमानानुसार दि ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी विद्यापीठास एकूण २८ वर्ष सेवा दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पदव्युत्तर विभाग, शैक्षणिक मान्यता विभाग, अभ्यास मंडळ, शैक्षणिक संलग्नीकरण, कुलगुरू यांचे कार्यालय, कुलसचिव कार्यालय, महाविद्यालय व विकास मंडळ वशैक्षणिक नियोजन व विकास विभागा इ विभागामध्ये आपली सेवा दिली.

व लिपिक नारायण तिडके हेही नियतवयोमानानुसार दि ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण २८ वर्ष सेवा विद्यापीठाला दिली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भौतिकशास्त्र संकुल, रसायनशास्त्र संकुल, अस्थापना विभाग, पात्रता विभाग व परीक्षा विभागामध्ये आपली सेवा दिली.

ठराविक वेतन कर्मचारी दासराव हंबर्डे हेही दि ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी विद्यापीठास २८ वर्ष सेवा दिली आहे.

या समारंभ कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास त्यांनी विद्यापीठास दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल कौतुक केले आणि त्यांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमय लाभो अश्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी केले. व या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनीही या सर्वांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदिश कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page