यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परिषदेवर डॉ चेतना सोनकांबळे
औरंगाबाद, दि.१८ : डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ.चेतना सोनकांबळे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र संकुलच्या परिषदेवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.सोनकांबळे या आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता असून विद्यार्थी विकास संचालक पदही त्यांनी भुषविले आहे. मुक्त विद्यापीठाचे संचालक प्रा.संजिवनी महाले यांनी डॉ.सोनकांबळे यांची नियुक्ती केल्याचे पत्राद्वारे घोषित केले आहे. या नियुक्ती बदल त्यांचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी अभिनंदन केले आहे.