‘रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सेल’च्या संचालकपदी डॉ भगवान साखळे

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ’रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सेल’च्या संचालकपदी प्राध्यापक डॉ भगवान काशिराम साखळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते संचालक डॉ भालचंद्र वायकर यांच्याकडून सेलचा त्यांनी पदभार घेतला.

Dr Bhagwan Sakhale
डॉ भगवान साखळे

विद्यापीठातील संशोधन बाबत नवीन प्रकल्पांना चालना देण्यासाठी सदर सेल काम करते. डॉ वायकर सेवानिवृत्त झाले. या पदावर कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी डॉ साखळे यांची नियुक्ती केली. डॉ साखळे हे सध्या रसायनतंत्र शास्त्र विभागप्रमुख, प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच कुलसचिव, व्यवस्थापन परिषद सदस्य, जीएमएनआरडीचे संचालक आदी पदांवर त्यांनी काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com