डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ’इंद्रधनुष्य’चे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले
- राजभवन’चे निरीक्षक डॉ प्रमोद पाब्रेकर यांची प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ’इंद्रधनुष्य’चे ’शिवधनुष्य’ यशस्वीरित्या पेलले. कुलगुरु डॉ विजय फुलारी व सहकारी यांनी अत्यंत कमी वेळेत उत्तम नियोजन करुन महोत्सव यशस्वी करुन दाखविला, अशी प्रतिक्रिया ’राजभवन’ निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ प्रमोद पाब्रेकर यांनी व्यक्त केली. ’इंद्रधनुष्य’च्या आयोजनासंदर्भात अत्यंत बारकाईने ते लक्ष ठेऊन आहेत. आठवडयाभरापासून ते मुक्कामी असून प्रत्यक्ष उपस्थित राहून संयोजक, सहभागी संघाचे प्रमुख व आयोजन समितीच्या मार्गदर्शन करीत आहेत. महोत्सवा संदर्भात डॉ पाब्रेकर म्हणाले. गेल्या २० वर्षापासून इंद्रधनुष्य मी जवळून अनुभवला आहे. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी खुप कमी काळात उत्तम नियोजन केले. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे व सहकारी रात्रंदिवस महोत्सवासाठी अविरत परिश्रम घेत आहेत, असेही ते म्हणाले.
आम्हीही महोत्सव एन्जॉय केला : डॉ कतलाकुटे
’राजभवन’च्या वतीने इंद्रधनुष्य वित्ताीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ गोविंद कतलाकुटे (नाशिक) यांची नेमणूक करण्यात आली आहे. या महोतसवात अनेक रंगमंचाना आम्ही प्रत्यक्ष भेटू देऊन महोत्सव ’एन्जॉय’ केल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. विशेषतः कुलगुरु अत्यंत कमी वेळेत उत्तम नियोजन केले. समिती सदस्यांनीही चोख कामगिरी बजावली.
अविस्मरणीय अनुभव राहिला : डॉ अंभुरे
गेल्या २० वर्षांपासून आपण अनेक सांस्कृतिक, साहित्य, कला महोत्सवात सहभागी होत आहोत. मात्र प्रत्यक्ष महोत्सवाचे आयोजन करण्याचा योग पहिल्यांदा लाभला. कुलगुरु यांच्या मार्गदर्शन व माझे सर्व समित्यातील सहकारी यांनी अविरत मेहनत घेतली. महोत्सव आयुष्यभर स्मरणीय राहील, अशी प्रतिक्रिया संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली.