डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष्य महोत्सवात शोभायात्रेसह तीस कलाप्रकार सादर

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष्य महोत्सवात चार दिवसात शोभायात्रा सह तीस कलाप्रकारात स्पर्धा घेण्यात आली. या महोत्सवात २९ कलाप्रकार तसेच शोभा यात्रा अशा ३० कला प्रकारात स्पर्धा संपन्न झाली.

यासाठी सृजनरंग (नाट्यगृह), नाद रंग (नाट्यशास्त्र विभाग खुले रंगमंच), अभिन्यात रंग (सिफार्ट सभागृह), शब्दरंग (पदार्थ विज्ञान विभाग) व ललित रंग (ललित कला विभाग) अशा पाच रंगमंचावर पाच दिवस स्पर्धा रंगली . यामध्ये शोभायात्रा, सुगम गायन पाश्चिमात्य, पाश्चिमात्य वाद्यवादन, समूह गायन पाश्चिमात्य, सुगम गायन भारतीय, समूह गायन भारतीय, शास्त्रीय सुर वाद्य, शास्त्रीय तालवाद्य, लोकवाद्यवृंद, शास्त्रीय गायन, नाट्य संगीत, शास्त्रीय नृत्य, लोक आदिवासी नृत्य, एकांकिका, मुकाभिनय, प्रहसन, मिमिक्री नकला, शॉर्टफिल्म, वकृत्व, प्रश्नमंजुषा, वादविवाद, चित्रकला, पोस्टर, मृदमूर्तीकला, कालाज, रांगोळी, व्यंगचित्रकला, स्पॉट फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन आदी कला प्रकारांचा समावेश आहे.

प्रहसन

सृजनरंग या मंचावर गुरुवारी ता.(१४) प्रहसन हा कलाप्रकार सादर झाला. यात बुवाबाजी, अंधश्रद्धा, , वासनांधता, जातीयवाद, स्र्तीला हीन आणि भोगवस्तू समजणेयावर प्रहार केले. तसेच सोशल मीडिया अतिवापर आदी विषयांवर आणि शेवटी प्रेमाने जग जिंकतां येते हा निष्कर्ष निघाला. आदी विषयावर प्रहसने सादर झाली. डॉ. विजयकुमार देशमुख, अमर देवकर आणि विश्वनाथ निळे यांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली. रंगमंच व्यवस्थापक समितीत डॉ. विनोद जाधव, डॉ. पराग हासे, डॉ. समाधान इंगळे, डॉ. ललित अधाने, डॉ. योगिता महाजन, डॉ. संगीता डोंगरे, डॉ. रामदास ठोके, डॉ. असलम शेख, डॉ. निरज बारसे, डॉ. सत्वशिला जाधव होते.

स्टेज क्रमांक चार शब्दरंग

Advertisement

वादविवाद स्पर्धा
या स्पर्धेत एकूण वीस संघांनी नोंदणी केली तर एकोणीस स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग नोंदवला. वादविवाद स्पर्धेचा विषय होता कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान? यात विद्यार्थ्यांनी अनुकूल -प्रतिकूल मते उत्स्फूर्तपणे मांडली. डॉ.अरुण पाटील, उमेश घेवरीकर आणि देवेंद्र प्रभुणे यांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली. डॉ.सादिक बागवान, डॉ.धम्मपाल जाधव,डॉ.दैवत सावंत, डॉ.विठोबा मस्के, महेश अनचिंतलवार यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे राबविला.

कलावंताच्या नजरा आता निकालाकडे

  • स्पर्धा संपल्या, ’इंद्रधुनष्य’महोत्सवाचा आज समारोप
  • शोभायात्रेसह तीस कलाप्रकारांची पारितोषिक वितरण
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती


गेल्या चार दिवसांपासून पाच रंगमंचावर सादर झालेल्या कलाप्रकारांची समाप्ती गुरुवारी झाली. आता राज्यभरातून आलेल्या युवा कलावंत निकालाची प्रतिक्षा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात आठवर्षांनंतर पुन्हा ’इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सव सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठात ११ ते १५ मार्च दरम्यान १९ व्या राज्यस्तरीय ’इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात २४ विद्यापीठाचे युवा कलावंत सहभागी झाले. कुलपती मा.रमेश बैस यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. तर कुलगुरु डॉ.विजय पुâलारी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सोहळा संपन्न होणार आहे. तर पारितोषिक वितरण व समारोप समारंभ शुक्रवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, अ‍ॅड.दत्तात्रय भांगे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. इंद्रधनुष्य महोत्सवाच्या समारोप समारंभाचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन तसेच सर्व समाज माध्यमावरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

सृजनरंग (नाटयगृह), नादरंग (नाटयशास्त्र विभाग खुले रंगमंच), अभिन्यात रंग (सिफार्ट सभागृह), शब्दरंग (पदार्थ विज्ञान विभाग) व ललित रंग (ललित कला विभाग) अशा पाच रंगमंचावर पाच दिवस संपन्न झाली. सात गटातील २९ कलाप्रकारात ही स्पर्धा रंगली तसेच शोभायात्रेतील तीन संघात पारितोषिक देण्यात येणार आहे.. स्पर्धेच्या तयारीसाठी सल्लागार समिती, संयोजन समिती स्थापन करण्यात आली. या साठी ३३ समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांचे सदस्य महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
महोत्सवासाठी राबले शेकडो हाथ
गेल्या १५ वर्षात तीन वेळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ’इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवाचे यजमानपद यशस्वीरित्या पेलले. सन २००८, २०१६ व २०२४ अशा तीन वेळा ही स्पर्धा घेण्यात आली. मा.कुलगुरु डॉ.विजय पुâलारी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले.
या सर्व समित्यांचे मिळवून जवळपास १०० हून अधिक सदस्यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महोत्सवात मेहनत घेतली. विविध विभागातील विद्यार्थी, स्वयंसेवक यांनीही महोत्वासाठी आपले योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page