डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट-२०२४ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

१ जूलैपासून ऑनलाईन नोंदणी

१ सप्टेंबर रोजी परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच डी एन्ट्रेन्स टेस्ट (पेट-२०२४) घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १ जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. अधिष्ठाता मंडळाची प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन वेळापत्रकास अंतिम मान्यता देण्यात आली. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपुर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

’पेट’साठी चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ महेंद्र शिरसाठ, डॉ संजय साळुंके, डॉ वैशाली खापर्डे, डॉ वीना हुंबे, संचालक डॉ भालचंद्र वायकर यांनी प्रयत्न केले. एकूण ३३ विषयासाठी ही परीक्षा होणार असून यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या, आंतरविद्याशाखा, व वाणिज्य या शाखांचा समावेश आहे. प्रवेशपूर्व प्रक्रिया ’ऑनलाईन’ पध्दतीने राबविण्यात येणार आहे. ’पेट’साठी पदव्यूत्तर पदवी (बी प्लस श्रेणी उत्तीर्णसह) विद्यार्थी नोंदणी करु शकणार आहेत.

’पेट-२०२४’ चे वेळापत्रक पुढील प्रमाणे :

Advertisement

ऑनलाईन नोंदणी १ ते २० जुलै,
कागदपत्रांची पडताळणी २८ जुले ते ८ ऑगस्ट,
प्राथमिक यादी १४ ऑगस्ट,
अंतिम यादी १९ ऑगस्ट,
पेट परीक्षा १ सप्टेंबर,
निकाल १२ सप्टेंबर.

या प्रमाणे ’पेट’चे वेळापत्रक असणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ भारती गवळी यांनी कळवले आहे.

३३ विषयासाठी पेट होणार

’पेट-२०२४’ ही एकूण चार विद्या शाखेतील ३३ विषयांसाठी घेण्यात येणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या शाखा, आंतरविद्याशाखा तसेच वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा यांचा समावेश आहे. या अंतर्गत शारिरीक शिक्षण, नाटयशास्त्र, शिक्षणशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, समाजकार्य, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संकणगशास्त्र, पर्यावरणशास्त्र, अन्न तंत्रज्ञान, भुगर्भशास्त्र, गणितशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, औषनिर्माणशास्त्र, पदार्थविज्ञान, संख्याशास्त्र, प्राणीशास्त्र, इंग्रजी, मराठी, संस्कृत, हिंदी, ऊर्दु, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, मानसशास्त्र, भुगोल, वाणिज्यशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र व पर्यटन प्रशासन आदी विषयांचा समावेश आहे. १ जुलै रोजी पासून ’पेट’साठी नोंदणी सुरु करण्यात येईल. त्याच दिवशी विषयनिहाय संशोधकांसाठीची रिक्त जागांची संख्या ही उपलब्ध असणार आहे, असे उपकुलसचिव परीक्षा विभाग विजय मोरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page