डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंद्रधनुष्य युवा महोत्सवात शास्त्रोक्त रागदारीतील स्वरांनी तरुणाई मंत्रमुग्ध

– शास्त्रीय गाययान १५ संघाचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर : एरव्ही शास्त्रीय संगीत या कलाप्रकारासाठी युवा महोत्सवात दर्दी रसिकांची वानवा असते. इंद्रधनुष्य युवा महोत्सवात मात्र शास्त्रीय गायन कला प्रकारासही रसिकांची झालेली गर्दी हे दुस-या दिवसाचे वैशिष्टये ठरले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरु असलेल्या इंद्रधनुष्य युवा महोत्सवात मंगळवारी (दि.१२) सकाळच्या सत्रात शास्त्रीय गायण सादर झाले. सिफार्ट सभागृहात अभिजात रंग ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पुढील संघांनी सहभाग घेतला.

१)कोड न २१ : – डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची विद्यार्थिनी चैताली पवार हीने राग वृंदावनी सारंग विलंबित एकताल बडा ख्याल आणि दृत तीन तालातील छोटाख्याल सादर केला.

२) कोड न १६ : – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी निषाद व्यास बैरागी याने भैरव रागाची विलंबित झपतालातील बडाख्याल आणि द्रुत एकताल बंदिश सादर केली.

३) कोड नं ४ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची
विद्यार्थिनी राग वृंदावनी सारंग हीने गीत सादर केले .

४) कोड नं ५ : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यार्थिनी मयुरी हरिकमकर हिते राग विलंबित एकताल बडाख्याल आणि छोटा ख्याल तीनतालातील बंदिशीचे सादरीकरण केले.

५) कोड नं १८ : – एस एन डी टी विद्यापीठाच्या प्राजक्ता शेंद्रे हिने पुरिया धनश्री रागाची बडाख्याल तीलवाड्यातील बंदिश द्रुत तीन तालातील छोटा ख्याल सादर केला .
६) कोड नं २४ – महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने राग यमन छोटाख्याल तीनतालातील बंदिश सादर केली.

७) कोड नं ३ : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थिनी आरोही मंडलिक हिने विलंबित एकतालातील राग जौंनपुरी बंदिश बडा ख्याल आणि तींनलातील छोटा ख्याल सादर केला .

Advertisement

८)कोड नं १३ – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थीनी अभिरूपा पैजण हिने मधुवंती रागातील बडाख्याल आणि तीन तालातील छोटा ख्याल आणि द्रुत एकतालातील तराणा सादर केला .

९) कोड नं १४ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कलावंताने राग रागेश्री विलंबित एक तालातील बडा ख्याल आणि द्रुत तीनतालातीलतीनतालातील छोटा ख्याल सादर केला .

१०) कोड नं २२ : – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने राग पूरिया धनश्री विलंबित एकतालातील बडा ख्याल आणि द्रुत तीनतालातील छोटा ख्याल सादर केला .

११) कोड नं ८ – मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी सुधांशू सोमण राग जोग कौंस विलंबित एकताल बडाख्याल आणि तीनतालातील छोटा ख्याल सादर केला .

१२) कोड नं १२ – डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे येथील शर्वरी बासरकर या विद्यार्थिनीने राग मध्यामावती सादर केला .

१३) कोड नं ९ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थिनी तेजस्विनी खोडतकर हिने राग दुर्गा विलंबित एकतालातील बडाख्याल आणि द्रुत एकतालातील छोटा ख्याल सादर केला .

१४) कोड नं ६ – संत गाडगबाबा अमरावती विद्यापीठाच्या श्री भाटी या विद्यार्थ्याने राग मारवा विलंबित एकटलातील आणि छोटा ख्याल द्रुत तीन तालातील बंदिशीचे सादरीकरण केले .

१५) कोड नं ७ – महारष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राग मुलतानी विलंबित एकतालातील बडाख्याल आणि द्रुत तीन तालातील छोटा ख्यालाचे सादरीकरण केले.

या स्पर्धेचे व्यवस्थापन व संयोजन डॉ संजय सांगवीकर, डॉ सागर चक्रनारायण, डॉ धनंजय वडमारे, प्रा अशोक भोसीकर, प्रा संजय भालेराव, डॉ युवराज गाहेराव यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण हेमा उपासनी, शारंगधर साठे, मकरंद हेंगणे यांनी केले. शास्त्रोक्त रागदारीतील स्वरांनी तरुणाई मंत्रमुग्ध केले. अभिजात रंगमंच पहिल्या दिवशी तरुणाईच्या अभिजात स्वरांनी बरसला. या शास्त्रीय गायनाला तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळाला. ’राजभवन’चे निरीक्षक डॉ. प्रमोद पाब्रेकर, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी या ठिकाणी भेट देऊन कलावंताना प्रोत्साहन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page