डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथोत्सवाचे उदघाटन संपन्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन
महापुरुषांसंबंधित ७०० ग्रंथ, प्रबंधाचा समावेश
छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फुले-शाहु-डॉ आंबेडकर यांच्या जीवनावरील ग्रंथ, दुर्मिळ ग्रंथ व शोधनिबंधाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव २०२४ अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथोत्सवाचे उदघाटन कुलगुरू प्रा विजय फुलारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्र-कूलगुरू प्रा वाल्मिक सरवदे यांच्या हस्ते झाले. ज्ञानस्रोत केंद्रामध्ये १० ते १३ एप्रिल या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांचे ग्रंथ तसेच या महापुरुषांविषयीच्या ७०० पेक्षा अधिक ग्रंथ व शोध प्रबंधाचा समावेश आहे.
याप्रसंगी अधिष्ठाता तथा ज्ञान स्रोत केंद्राच्या संचालक डॉ वैशाली खापर्डे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ कैलास अंभुरे, अधिष्ठाता डॉ वीणा हुंबे, सहाय्यक ग्रंथपाल डॉ सतीश पद्मे, प्रा पुरुषोत्तम देशमुख, अधिसभा सदस्य प्रा चंद्रकांत कोकाटे, डॉ अपर्णा अष्टपुत्रे, ग्रंथालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू प्रा विजय फुलारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित ज्ञान स्रोत केंद्रात उपलब्ध असलेल्या मुबलक वाचन साहित्याचा उल्लेख केला. तसेच या वाचन साहित्याचा सर्व विद्यार्थ्यांना उपयोग झाला पाहिजे व त्यातून आजचा विद्यार्थी घडला पाहिजे असे प्रतिपादन केले. येत्या शनिवारपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.