डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेसह प्रोफेशनलचे निकाल जाहीर
३० दिवसाच्या आत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल घोषित
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी विद्या शाखेतील अभ्यासक्रम तसेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ भारती गवळी यांनी दिली. सन २०२३-२५ या वर्षांतील अभियांत्रिकी विद्या शाखेच्या परीक्षा १५ मे ३ जून दरम्यान घेण्यात आली. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली चारही जिल्हयातील केंद्रातील मुल्यांकनाचे काम वेळेत पुर्ण करण्यात आले.
या शाखेतील बी टेक, एम टेक, बी फॉर्मसी, एम फार्मसी, फार्म डी, एम ई, एमसीए, अभियांत्रिकी प्रथम वर्ष आदी अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत घोषित करण्यात आले. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा १६ ते ४ जून या दरम्यान घेण्यात आली. या गटातील एकूण १४ अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत घोषित करण्यात आले. यामध्ये एलएलबी, बी ए एलएलबी, बीएड, एम एड, बी पी एड, एम पी एड, बीपीई आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
निकाल वेळेत घोषित करण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचे मूल्याकंन केंद्राचे संचालक डॉ अशोक नरुटे यांनी प्रयत्न केले. तर विधी अभ्यासक्रमाकरिता डॉ शिल्पाराणी डोंगरे यांनी काम पाहिले आहे. तसेच विद्यापीठ उपकेंद्र येथील उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे संचालक म्हणून डॉ महेश कळलावे व डॉ एम के पाटील यांनी काम पाहिले. या तीनही मूल्याकंन केंद्राच्या संचालकांना विविध महाविद्यालयातील अध्यापकांनी सहाकर्य केले. तसेच कक्षाधिकारी डॉ सतीश दवणे यांनी सहकार्य केले.