डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्यावतिने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . या निमित्त : इतिहासाची मूल्ये व मतप्रवाह’ या विषयावर राष्ट्रीय परीसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग तथा माजी विद्यार्थी समितीच्या प्रमुख डॉ पुष्पा गायकवाड होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून माजी विद्यार्थी तथा माध्यमतज्ज्ञ डॉ वि. ल. धारूरकर, डॉ.दिपक गायकवाड, डॉ. शुभदा भालेराव राजेंद्र देशपांडे यांची उपस्थीती होती. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ बीना सेंगर यांनी केले. त्यात त्या म्हणाल्या की,विद्यार्थी ज्ञानाधिष्ठीत बनविण्यासाठी आम्हाला आदरणीय व्यक्ती ज्या आपल्या सोबत असतात, ते मुल्याधिष्टीत आदर्श नीतीतत्वे आमच्यावर संस्कार करत असतात. असे सांगितले.

पुढे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्याख्याते प्रा.डॉ. वि.ल. धारूरकर म्हणाले की, जगाच्या इतिहासात भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही क्रांतीकारी चळवळ होती. भारतीय राष्ट्रवादाच्या क्रांतीत अरुणा असफअली या महीलेने सर्वात प्रथम भारतीय राष्ट्र‌ध्वज फडकवला तेव्हापासुन भारतातील महीला यांचा भारतीय स्वातंत्र्य लढयात हिरीरीने सहभाग वाढला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात तीन महत्वाचे प्रवाह महत्वाचे मानले जातात . त्यात ब्रिटीशांचा वसाहदवाद, राष्ट्रवाद, ‘कम्युनिझम, समाजवादी इतिहास असे वेगवेगळे प्रवाह भारतीय इतिहासाला ध्येयवाद दिला. त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने समाजाला दिशा देणे गरजेचे आहे आणि इतिहास हीच सामाजिक प्रक्रिया आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा विचारातून आपल्याला ध्येयवाद मिळत असतो तसा ध्येयवाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून राष्ट्र‌निर्मितीच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली होती असा उल्लेख न्या रानडे यांनी आपल्या ग्रंथात केला आहे. इतिहास लेखन करताना संशोधकाने असे वेगवेगळे विचार प्रवाह समजुन घेत वस्तुनिष्ठपणे संशोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. इतिहासकार वस्तुनिष्ठ असायला हवा कारण तो एक न्यायाधीशाची भूमिका निभावत असतो, असे सांगुन डॉ बाबासाहेब आंबेडकर, खैरमोडे आदिचे उदहारण देऊन इतिहासाचे संशोधन समाजाच्या व्यापक अंगाने व्हायला हवी असे प्रतिपादन त्यांनी केले

Advertisement

यानंतर प्रा दिपक गायकवाड यांनीही सांगितले की, विदयार्थी दशेत असताना सांगितले की विद्यार्थी दशेत वेगवेगळे घटक प्रवाह लक्ष्यात घेवुन पद्‌धतीन आपले संशोधन करायला हवे. डॉ. शुभदा धारूरकर यावेळी म्हणाल्या, की राष्ट्रवाद अशी भावना आहे की ती आम्हाला जन्मत: च रुजवली जाते . स्त्रीयांचा भारतीय स्वातंत्र्यात मोठा सहभाग होता हे राष्ट्रवादाचे मोठे उदाहरण आपल्याला बघायला मिळते. स्त्री राष्ट्रवादाच्या पलीकडे जावुन मानवी दृष्टीकोनाच्या अनुशंगाने विचार करत असते. ती निरपेक्षतेने इतिहा साचे अवलोकन करत वस्तुनिष्ठपणे इतिहासाचे लेखन करते. भारतीय इतिहासात महीलांनी राष्ट्र‌वादाला दिलेल्या प्रेरणेतून महीला वेगवेगळ्या ओदोलन , लढे, संघर्ष करतांना दिसतात.असे सांगितले. त्यानंतर डॉ गीतांजली बोराडे यांनी भाष्य केले. डॉ. पुष्पा गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णमाला म्हस्के यांनी तर आभार कृष्णा काळे यांनी केले. यावेळी डॉ. गणी पटेल, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. हरी जमाले यांच्यासह मान्दवर उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील प्राध्यापक डॉ.सुनीता सावरकर, डॉ.दिंगबर जाधव, डॉ.संजय पाईकराव, अश्विन जोगदंड, रवी गावंदे, प्रियंदर्शन हटकर, सुधीर बालखंडे, कुमार भवर, अमोल कुलकर्णी, स्वाती बांगर, अविनाश सावंत व विध्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page