डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० साप्ताह निमित्त व्याख्यान
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच अर्थशास्त्र विभागातील प्लानिंग फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० साप्ताह निमित्त एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एन.एन. बंदेला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने प्लानिंग फोरम, अर्थशास्त्र विभाग, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रम व रोजगार मंत्रालय,भारत सरकारच्या एन.सी.एस. उपक्रमाचे समन्वयक डॉ. अनिल जाधव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तपशीलवार समजाऊन सांगितले तसेच एन. सी. एस. (National Career Services) चे फायदे, त्यातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विनामूल्य सेवा ई. ची माहिती दिली. विद्यापीठातील मानवता विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शैक्षणिक धोरण लागू करण्यामागची भूमिका तपशीलवार सांगितली तसेच अधिष्ठाता म्हणून हे धोरण राबवतांना काय काय विकासात्मक कामे विद्यापीठ करीत आहे यावर प्रकाश टाकला. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम यांची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे यांनी केले तर अर्थशास्त्र विभागातील प्लानिंग फोरम समन्वयक डॉ. कृतिका खंदारे यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमास अर्थशास्त्र विभागातील प्रा. एस.एस. नरवाडे, प्रा. ए.एस. पवार, प्रा. सी. एन. कोकाटे उपस्थित होते.