इंद्रधनुष्य महोत्सव : रांगोळीतून साकारले राजा, रंक अन् राव

ललितरंग गटात रांगोळी, कोलाज स्पर्धा संपन्न

मुलीसोबतच आठ मुलांनीही साकारली रांगोळी

छत्रपती संभाजीनगर : ललितरंग गटात दुस-या दिवशीच्या रांगोळी व कोलाज कलाप्रकारात युवकांनी दर्जेदार कलाकृती साकारल्या. निसर्गाचे चित्रण करतांनाच अनेकांनी राजा, रंक अन् राव अशी सर्व स्तरावरील व्यक्तिचित्रेही रेखाटली. डॉ बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष्य महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात तिस-या दिवशी बुधवारी (दि.१३) ललितरंग गटात रांगोळी व कोलाज स्पर्धा संपन्न झाल्या. युवा चित्रकारांनी आपल्या कलेतून एकाग्रतेचे दर्शन घडविले. सकाळच्या सत्रात झालेल्या कोलाज स्पर्धेत १९ संघानी सहभाग घेतला.

यामध्ये व्यक्ती चित्र, वस्तूचित्र, निसर्गचित्र या विषयावर कोलाज काढण्यात आले. दुपारच्या सत्रात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्चे पारंपारिक चित्र, व्यक्ती चित्र व निसर्गचित्र ही संकल्पना होती. यामध्ये २१ संघानी घेतला. कोलाज गटात मुले तसेच मुलीही सहभागी झाल्या. ललित कला विभागाच्या कलादालनातून युवा कलावंत तहान, भूक विसरुन कलाकृती साकारण्यात मग्न झालेले दिसून आले. तर दुपारच्या सत्रात रांगोळी गटात मुलीसोंबतच आठ मुलांनीही रांगोळी साकारली. यामध्ये ग्रामीण महिला, पुरुष अगदी शिवाजी महाराजांचे छायाचित्रही साकारले. तसेच महात्मा बस्वेश्वर, नववधू, शेतकरी, पारंपारिक पध्दतीतील माणूस आदी व्यक्तीचित्रे साकारली. उगवता सूर्य, जंगल, खेडयातील सायंकाळ आदी विषयावरील रांगोळया विद्याथ्र्यांनी साकारल्या.

प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, सल्लागार समिती सदस्य डॉ. योगिता होके पाटील, डॉ. भास्कर साठे, संयोजन समिती सदस्य अ‍ॅड. अरविंद वेंâद्रे, डॉ. चत्रभूज गोडबोले यांनी विविध रंगमंचावर भेट दिली. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम, डॉ.सतीश शेळके, डॉ.राम कदम यांनीही विविध मंचाना भेटी देऊन युवा कलावंताचे कौतुक केले. या ठिकाणी गुरुवारी (दि.१४) स्पॉट फोटोग्राफी स्पर्धा होणार आहे. कोलाज स्पर्धेचे परीक्षण सुनील देशपांडे, मनीपद्म हर्षवर्धन व राजेश कांबळे यांनी केले. तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण श्रीनिवास पत्की, चित्रगंधा सुतार व चारुदत पांडे यांनी केले .सर्व कलाप्रकारात या गटात सर्वात निवांत आणि शांततेने दोन दिवसातील स्पर्धा पार पडली. या स्पर्धासाठी विभागप्रमुख डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.गजानन पेहरेकर, सौरभ शिरमाने व निखील राजवर्धन यांनी संयोजन केले.

पाश्चिमात्य कला प्रकारासही रसिकांची दाद

शब्दांपेक्षा भावना ठरली प्रबळ

संगितामध्ये शब्द, भाषा याहीपेक्षा भावना जास्त महत्वाची असते असे म्हटले जाते. याचा प्रत्यय पाश्चिमात्य कलाप्रकारात आला. शब्दांपेक्षाही स्वर अन् गाण्यापेक्षाही सूर उपस्थित रसिकांना चांगलाच भावला.
नाटयगृहाशेजारी उभारण्यात आलेल्या नादरंग या क्रमांक दोनच्या मंचावर पाश्चिमात्य कला प्रकार सादर झाले . यामध्ये सुगम गायन (पाश्चात्य) या कला प्रकारामध्ये १२ विद्यापीठांनी सादरीकरण केले. वाद्यवादन (पाश्चात्य) या कला प्रकारामध्ये नऊ विद्यापीठे सहभागी झाली. तर समुह गायन (पाश्चात्य) या कलाप्रकारात ११ विद्यापीठे सहभागी झाली. समिती सदस्य डॉ.स्मिता साबळे, डॉ.अनिरुद्ध मोरे, प्रा.संजय बिरंगणे, प्रा.बाळासाहेब गायकवाड व प्रा.कारभारी भानुसे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. तर अभिजीत भावे, नरेंद्र पुल्ली व सरफराज कुरेशी यांनी परीक्षण केले.

मधुर तालसुरांनी ‘कानसेन’ सुखावले

-‘शास्त्रीय तालवाद्य’मध्ये १७ संघाचा सहभाग

Advertisement

१)कोड नं ३ डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ योगेश क्षीरसागर याने पखवाज बहारदार सुलताल वादन केले.
२)कोड नं १४ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रसाद महाजन याने तबला वादन ताल तीनताल चे सादरीकरण केले .
३)कोड नं २० शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर प्रशिक कांबळे याने बहारदार सादरीकरण केले
४)कोड नं १२ डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ,अभिजित तडाके तबला वादन त्रिताल
५) कोड नं २४ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
६)कोड नं ७ महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर तुषार पाटील तबला वादन त्रिताल
७)कोड नं ४ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
विद्यार्थी तबला
८)कोड न १६ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ आकाश पाटील विद्यार्थ्याने तबला वादन ताल त्रिताल
९)कोड नं ८ मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विराज म्हात्रे याने पखावज ताल रुद्र
१०)कोड न २१ डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ विद्यार्थी श्रेयस गायकवाड याने तबलावादन ताल तीनताल
११)कोड नं ५ कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी महेश पाटील याने पखवाज वादन आदी तालाचे सादरीकरण केले.
१२) कोड नं २३ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सोहम पुरकर तबला वादन तीन ताल चे सादरीकरण केले.
१३) कोड नं १ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला ऋषिकेश बोडखे चौताल
१४) कोड नं ९ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
१५)कोड नं १३ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी मुंजाजी शिंदे ताल चौताल बहारदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली
१६)कोड नं१७ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक विद्यार्थिनी नुपूर कुलकर्णी तबला वादन ताल तीनताल सादर केला
१७) कोड नं ६ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अजिंक्य महल्ले याने तीनतालाचे सादरीकरण केले .
स्पर्धेचे परीक्षक शारंगधर साठे, डॉ राम बोरगावकर, मुकुंद मराठे यांनी केले.अभिजातरंगचे व्यवस्थापन डॉ संजय सांगवीकर, डॉ सागर चक्रनारायण, डॉ धनंजय वडमारे, प्रा अशोक भोसीकर, प्रा संजय भालेराव, डॉ युवराज गाहेराव यांनी केले. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, सल्लागार समिती सदस्य डॉ.योगिता होके पाटील, डॉ.भास्कर साठे, संयोजन समिती सदस्य अ‍ॅड.अरविंद केंद्रे, डॉ.चत्रभूज गोडबोले यांनी विविध रंगमंचावर भेट दिली. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम, डॉ.सतीश शेळके, डॉ.राम कदम यांनीही विविध मंचाना भेटी देऊन युवा कलावंताचे कौतुक केले.

तरुणाईने जोशात मांडला विकसीत भारताचा पट

सर्वच विद्यापीठांचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

’इंद्रधनुष्य’ महोत्सवातील ’शब्दरंग’ गटानी या वक्तृत्व स्पर्धेत सर्वच विद्यापीठांच्या संघाने सहभाग नोंदविला. ’विकसित भारत – २०४७’ हा विषय तरुणांनी अत्यंत जोरदारपणे मांडला महोत्सवाच्या तिस-या दिवशी बुधवारी (दि.१३) पदार्थविज्ञान विभागाच्या सभागृहात सकाळच्या सत्रात ही स्पर्धा संपन्न झाली. एका युवकांने इंग्रजीतून तर तीन जणांनी हिंदीतून भाषण केले. उर्वरित विद्याथ्र्यांनी मात्र मराठीतून आपले विचार मांडले. विकसीत भारताचा पट मांडताना सद्यकालीन परिस्थिती सुधारण्याची अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली. या रंगमंचावर गुरुवारी (दि.१४) सकाळच्या सत्रात वादविवाद स्पर्धा रंगणार आहे.वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन डॉ.सादिक बागवान, डॉ.धम्मपाल जाधव, डॉ.दैवत सावंत, डॉ.विठोबा मस्के, महेश अचिंतलवार यांनी केले .

प्रश्नमंजूषा

मंच क्रमांक चार ‘शब्दरंग’ इथे दुपारच्या सत्रामध्ये प्रश्नमंजूषा हा प्रकार घेण्यात आला. यामध्ये वीस विद्यापीठांचे संघ उपस्थित होते. पहिल्या सहा संघाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. प्रश्नमंजूषाची अंतिम फेरी ही गुरुवारी मंच क्रमांक दोन नादरंग इथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page