डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने प्राध्यापकांच्या ७३ जागांची भरती होणार

’समर्थ पोर्टल’वरुन २ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. २ एप्रिल ते २ मे दरम्यान केंद्र शासनाच्या ’समर्थ पोर्टल’ वरुन ’ऑनलाईन’ पध्दतीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील २८९ जागा मंजूर असून आजघडीला १३० शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त १५९ जागांपैकी ७३ पदे भरण्यास राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली. सप्टेंबर २०२३ मध्ये या भरतीसाठी अर्जही मागविण्यात आले, यावेळी ५ हजार ८१५ अर्ज ऑनलाईन तर सुमारे ४ हजार ६०० हॉर्डकापी जमा झाल्या. तथापि सदर भरती प्रक्रिया जुलै २०२४ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदे बैठकीत रद्द करण्यात आली.

Advertisement

सदर पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेरीस मार्चमध्ये पदभरतीस मान्यता देण्यात आली. नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी ७३ पद भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक आठ, सहायोगी प्राध्यापक १२ पदे व सहय्यक प्राध्यापकांची ५३ पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रशासनाने विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी ’समर्थ पोर्टल’ तयार केले असून या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली असून २ एप्रिल ते २ मे दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तर ऑनलाईन अर्जाची प्रत व सर्व कागदपत्रासह हार्ड कॉपी आस्थापना विभागात ९ मे रोजी कार्यालयीन वेळेत दाखल करावेत, असे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page