डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तरच्या प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

५५ विभागात रिक्त जागांवर थेट प्रवेश


औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभागात प्रवेशासाठी १० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन टप्प्यात ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. प्रवेशित विद्यार्थ्यांची जागेवरच सर्व प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यात आली.  प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, उपकुलसचिव डॉ.आय.आर.मंझा, आदींसह प्रवेश समितीचे २२ सदस्य उपस्थित यांनी प्रवेश प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मानव्यविद्या, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र व आंतरविद्याशाखेळीत प्रवेश प्रक्रिया होती. प्रवेश प्रक्रियेसाठी ‘युनिक’चे दिनेश कोलते, यशपाल साळवे, सचिन चव्हाण यांच्यासह पदव्यूत्तर विभागाच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

DR BAMU GATE


आजपासून ‘स्पॉट अ‍ॅडमिशन’ प्रक्रिया

Advertisement


पहिल्या तीन टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविद्या, आंतरविद्या, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेतील तसेच व्यायवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन प्रवेश फेरीच्या माध्यमातून  प्रवेश देण्यात आले.  तिनही फेरी झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते ३१ जुलै या दरम्यान स्पॉट ॲडमिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पॉट अ‍ॅडमिशनच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. रिक्त जागांवर ‘फर्स्ट कम फर्स्ट अ‍ॅडमिशन बेसिस’वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सर्व प्रकारचे सहकार्य : मा.कुलगुरुङ
 विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास घडविणारे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.  देशातील सर्वाधिक संशोजक घडविणा-या आपल्या विद्यापीठात अत्यंत अन्य खर्चात शिक्षण, वसतीगृह या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही ते म्हणाले. अत्यंत सर्व सामान्य घरातील पदवीधर विद्यार्थी आपल्या विद्यापीठात पदव्यूत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांना अत्यंत अल्पदरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कमवा व शिका योजनेतंर्गत मानधनही वाढविण्यात आले आहे. नवीन विद्यार्थ्यांने विद्यापीठात स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page