डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा सेवागौरव संपन्न
सेवक कल्याणनिधीसह विविध उपक्रम राबविणार – कुलगुरु डॉ विजय फुलारी
निवृत्ती दिवशीच मिळाला चार लाखांचा धनादेश
छत्रपती संभाजीनगर : सेवक कल्याण निधीची स्थापना चालू वर्षापासून करण्यात येणार आहे. आगामी काळात शिक्षक, कर्मचारी भरती तसेच पदोन्नतीचे सर्व विषय मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऑगस्ट अखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव समारंभ शनिवारी (दि ३१ ) झाला. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सामान्य प्रशासन विभागातील लघुलेखक अंबादास वाघ, वरिष्ठ सहाय्यक साहेबराव मुळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुरेश गायकवाड, उर्दू विभागातील शिपाई खान हबीबखान ऊस्मानखान यांचा सेवागौरव करण्यात आला. त्यांच्या कुटुंबातील मंगल फरताडे उषा गायकवाड, उषा मुळे यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी कुलगुरु डॉ विजय फुलारी म्हणाले, गरजू कर्मचारी शिक्षकांसाठी सेवा कल्याण निधीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी स्वच्छेने प्रत्येकाकडून महिन्यात शंभर रुपये जमा करण्यात येतील. यासाठी कोणासही सक्ती करण्यात येणार नाही. प्र-कुलगुरू यांचे अध्यक्षतेखालील समिती पारदर्शकपणे यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले
आपण नेहमीच न्यायाच्या बाजुने उभे असून कोणताही अभिनिवेश न बाळगता विद्यापीठात्ता पुढे नेऊ, असेही कुलगुरु डॉ विजय फुलारी म्हणाले. यावेळी अंबादास वाघ यांनी आपले सेवतेतील अनुभव कथन केले. प्रारंभी चारही जणांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. डॉ संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर संजय लांब यांनी आभार मानले. उपकुलसचिव डॉ संजय कवडे, कर्मचारी संघटनेचे अनिल खामगावकर यांच्यासह शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते .
कर्मचाऱ्यांचा खात्यात चार लाख जमा
शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांना सेवानिवृत्तीच्या वेळी जास्तीत जास्त ३०० दिवसांच्या शिल्लक रजांची रोख रक्कम देण्यात येते. यापुर्वी कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयांचा निधी निवृत्तीच्या दिवशी मिळत असे. या संदर्भात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत सदर रक्कम चार लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संपुर्ण रक्कम शंभर टक्के देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. यावेळी चार कर्मचारी निवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण योजनेचा लाभ झाला. रजा रोाखीकरणाचे चार लाख रुपये सेवानिवृत्तीच्या अखेरीच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात जमा झाले.