डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्यूत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ
- यापुढे मुदतवाढ मिळणार नाही
औरंगाबाद, दि.२४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील पदवी पदव्युत्तर पदव्यूत्तर विभागात प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहेत . डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. मुख्य परिसरातील मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच आंतरविद्याशाखेतील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. तिन्ही फेरी झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते ३१ जुलै या दरम्यान विद्यार्थ्यांना स्पॉट अॅडमिशनच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. रिक्त जागांवर ‘फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस’वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा २१ ऑगस्टपर्यंत तर आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .
विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता प्रसिध्द केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेमध्ये निर्धारीत केलेल्या सर्व पदवी व पदव्यूत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्याच्या प्रवेश प्रक्रियेची अंतीम तारीख अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्याच्या अटीवर ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तद्अनुषंगाने सर्व संबंधित महाविद्यालयांनी पात्रता आवदेन पत्र विहित शुल्कासह १० सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत . यापुढे प्रवेशासंबंधी कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांनी कळविले आहे.
यापुढे मुदतवाढ नाही : कुलगुरू
देशातील सर्वाधिक संशोधक घडविणा-या आपल्या विद्यापीठात अत्यंत अन्य खर्चात शिक्षण, वसतीगृह या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आहेत. या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांना अत्यंत अल्पदरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कमवा व शिका योजनेतंर्गत मानधनही वाढविण्यात आले आहे. पदवी व पदव्यत्ततर अभ्यासक्रमासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.