डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ‘नॅक ए प्लस’ मानांकन जाहीर
कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश
ऐन दिवाळीत मिळाली आनंदाची वार्ता
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास राष्ट्रीय अधिस्विकृती व अधिमान्यता परिषदेने (नॅक) ३.३८ ‘सीजीपीए’सह ‘ए-प्लस’ मानांकन जाहीर केले आहे. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यातच विद्यापीठाला मोठे यश मिळवून दिले आहे. ऐन दिवाळीत ही आनंदाची वार्ता मिळाली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ‘फोर्थ सायकल’ अंतर्गत ’नॅक पिअर टीम’ने २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान भेट दिली. स्वयंमूल्यमापन अहवाल व पिअर टिंग भेटीच्या अहवालानुसार नॅकच्या स्टॅडिंग कमिटीने ३० सप्टेंबरच्या बैठकीत मान्यता दिली. तर गुरुवारी (दि ३१) सकाळी ग्रेड जाहिर केल्याचा मेल प्राप्त झाला. नॅकचे माजी संचालक तथा माजी कुलगुरू प्रा ए एन राय यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय ’पिअर टिम’मध्ये देशातील नामवंत प्राध्यापकांचा संप सहभाग होता.
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी कुलगुरुपदाची सुत्रे २४ जानेवारी २०२४ रोजी हाती घेतल्यानंतर ’नॅक’चे काम प्राधान्याने हाती घेतले. पदभार घेतल्यानंतर पहिली बैठक देखील अंतर्गत गुणवत्ता हमी सेल समिती सोबतच त्यांनी घेतली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (IQAC) अविरत परिश्रम करून डाटा संकलन केले. राष्ट्रीय अधिस्वकृती व अधिमान्यता परिषदेस (नॅक) ’स्वयं मुल्यामापन अहवाल (SSR) सादर केला.
तयारीच्या अनुषंगाने कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी या काळात पाच वेळेस शैक्षणिक विभागांना भेटी देऊन आढावा घेतला. तसेच अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकांच्या वेळोवेळी आढावा बैठक घेऊन सूचना केल्या. तसेच सर्व अहवाल पाठवितांना आयक्युएसी कक्षातच कुलगुरु बसून राहत असत.
तसेच प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, आयक्यूएसी संचालक डॉ गुलाब खेडकर, सल्लागार डॉ एम डी जहागीरदार व समितीच्या सर्व सहकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेसाठी अविरत प्रयत्न केले. सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक, विभाग प्रमुख, कर्मचारी, विद्यार्थी तसेच रोज स्टेक होल्डर्स यांनी नॅक मूल्यांकनाच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी आपले योगदान दिले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातील डॉ गिरीश काळे, रोहन गावडे यांनी नॅक प्रियंकानाच्या काळात अहोरात्र मेहनत घेतली. नॅक प्लस या मानांकनाची व्हॅलिडीटी २९ ऑक्टोबर २०२९ पर्यंत असणार आहे .
नॅक ग्रेड -चढ़ता आलेख
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आतापर्यंत चार वेळा नॅक झाले आहे. ग्रेडिंगचा आलेख मात्र चढत्या क्रमाने राहिला आहे .
वर्ष – सीजीपीए – नॅक ग्रेड (Cumulative Grade Point Average)
२००३ – २.९२ बी प्लस,
२०१३ – ३ .०७, ए ग्रेड
२०१९ – ३.२२ , ए ग्रेड
२०२४ – ३ .३८, ए प्लस
सर्वांच्या सोबतीने विद्यापीठाला पुढे नेऊ : कुलगुरू डॉ विजय फुलारी
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणाऱ्या आपल्या विद्यापीठास ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन मिळाले ही अत्यंत अभिमानाची, आनंदाची व ऐतिहासिक अशी घटना आहे. पीईएस शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात आहे. आगामी काळात देखील सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा व नावलौकिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ विजय फुलारी व्यक्त केली.
नॅक मूल्यांकनातील महत्त्वाचे टप्पे
१. प्राध्यापक डॉ विजय फुलारी यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली – २४ जानेवारी २०२४
२. आयआयक्युए अहवाल सादर – मार्च
२. अहवाल स्विकारून नॅक प्रक्रियेसाठी मान्यता – ४ एप्रिल
३. स्वयं मूल्यमापन अहवाल सादर – १६ मे
४. डीव्हीव्ही रिपोर्ट मान्य – १६ जून
५. प्राथमिक पात्रता – ४ सप्टेंबर
६. मॉक नॅक – २३ ते २५ सप्टेंबर
७. कुलगुरूंच्या विभागांना भेटी
८. नॅक पिअर टीम भेट – २२ ते २४ ऑक्टोंबर
९. नॅक ग्रेड जाहिर – ३१ ऑक्टोबर २०२४
१०. ग्रेडची व्हॅलिडीटी – २९ ऑक्टोबर २०२९