डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या संचालकपदी डॉ.अभिजीत शेळके
छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या संचालकपदी डॉ.अभिजीत शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी सदर नियुक्ती केली आहे. डॉ.शेळके हे दोन दशकांपासून व्यवस्थापनशास्त्र विभागात कार्यरत असून सध्या वरिष्ठश्रेणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अधिसभा सदस्य, अधिष्ठाता, संचालक आदी पदावर त्यांनी कार्य केले आहे. डॉ.शेळके यांना टाटा लिबर्ट लिमिटेडमध्ये सहाय्यक व्यवस्थापपक म्हणून ७ वर्षांपेक्षा जास्त उद्योगाचा अनुभव आहे. त्यांना मार्वेâटिंगमध्ये रस आहे आणि ते मार्वेâटिंग, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि इंडस्ट्रियल मार्वेâटिंग या विषयावर अभ्यासक्रम शिकवतात.
डॉ.शेळके हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीइ, नाशिक आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर कार्य केले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या जनरल कौन्सिलचे सदस्य व महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरेप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट एमसीईडी चे सल्लागार मंडळ संदस्य म्हणून कार्य केले आहे. डॉ.फारुक खान यांच्याकडून त्यांनी सोमवारी (दि.दोन) संचालक पदाची सुत्रे स्विकारली. आगामी तीन वर्षासाठी सदर नियुक्ती असणार आहेत. प्रा.शेळके यांनी विविध राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय परिषदा आणि नियतकालिकांमध्ये शोधनिबंध सादर करुन प्रकाशित केले असून त्यांना दोन पेटंट मिळाले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेला एक मोठा संशोधन प्रकल्प त्यांनी पूण केला आहे. तसेच भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून ८० लाख रुपयांच्या निधीतून त्यांनी आणखी एक मोठा प्रकल्प पूर्ण केला आहे.