सौ के एस के महाविद्यालयात भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

बीड : सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नवगण शिक्षण संस्था राजुरी नवगणच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ दीपा क्षीरसागर यांच्या मार्गर्शनानुसार १५ ऑक्टोंबर हा डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

Advertisement

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ अशोक डोंगरे म्हणाले की, डॉ ए पी जे अब्दुल कलाम  यांच्या एकूण शिक्षण संशोधन आणि कार्य याचा अभ्यासपूर्ण आलेख या प्रसंगी व्यक्त केला. महान व्यक्तीचें मौलिक विचारांचे सामुहिकरित्या वाचन करण्यात यावे. वृत्तपत्र वाचन, अग्रलेख यांचे प्रामुख्याने वाचन केले पाहिजे. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन कार्मचारी प्रतिनिधी डॉ बळीराम राख यांनी तर आभार डॉ पल्लवी इरल्लापल्ले यांनी मानले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ खान अन्सारउल्ला शफिउल्ला, पर्यवेक्षक  जालिंदर कोळेकर, ग्रंथपाल शेख जी आय तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page