नेहरू महाविद्यालयात स्व प्रा डॉ चित्रा अस्थाना यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रंथ दान
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात स्वर्गीय प्राध्यापिका डॉ चित्रा अस्थाना यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोनशेहून अधिक ग्रंथ दान करण्यात आले. यावेळी त्यांच्या कन्या प्रा डॉ शैली अस्थाना यांनी हे ग्रंथ दिले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मून, उपप्राचार्य डॉ एस आर मंझा व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ मंझा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये प्राध्यापिका डॉ चित्रा अस्थाना यांच्या आठवणीला उजाळा दिला. त्यांचा स्टाफ रूम मधला वावर आणि त्यांचे हिंदी भाषेवरचे प्रभुत्व या विषयावर डॉ मंझा सरांनी मत व्यक्त केले.
डॉ शैली अस्थाना यांनी त्यांचे विचार मांडत असताना असे सांगितले की डॉ चित्रा अस्थाना नेहमी म्हणत असत की त्यांचे दोन घर आहे एक महाविद्यालय आणि दुसरे स्वतःचे घर. त्यांचे हे ग्रंथ त्यांची एक आठवण म्हणून आणि त्यांनी जवळजवळ ३४ वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्ययन केले तसेच नेहरू महाविद्यालयाशी एक ऋणानुबंध म्हणून त्यांची ही ग्रंथ संपदा नेहरू महाविद्यालयात दान करावी अशी त्यांची इच्छा होती.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मून सरांनी ही त्यांच्या आणि एकूणच जुने जनरेशन आणि आताचे जनरेशन आणि वाचन संस्कृती यावर प्रकाश टाकला. डॉ मून सरांनी त्यांचे मत व्यक्त करताना असे सांगितले की, एकूणच ग्रंथाचा जो सुगंध आहे तो आताच्या पिढीला माहिती नाही. यावेळी डॉ संजय मून सरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयातील तळघराच्या पुस्तकाचा सुगंध कसा असतो आणि आताची या पिढीला या सुगंधाचा अनुभव कसा येईल याविषयी विचार व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाला ही ग्रंथ संपदा भेट दिल्याबद्दल त्यांनी डॉ चित्रा अस्थाना व डॉ शैली अस्थाना यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा डॉ शिल्पा जीवरग यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा तुपे आर आर यांनी परिश्रम घेतले. प्रा डॉ शैली अस्थाना यांना ग्रंथालय तर्फे कृतज्ञता पत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मून सरा तर्फे देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.